मालाड दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाख तर राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मालाड इथं इमारत कोसळून झालेल्या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून ही मदत देण्यात येणार असून जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत मिळणार आहे.तर कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.