व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणामुळे खाजगीपणाच्या हक्कावर गदा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्स अॅप या समाजमाध्यम मंचाचं प्रायव्हसीविषयक धोरण भारतीय माहिती तंत्रज्ञान विषयक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं केंद्रसरकारनं दिल्ली उच्च न्यायालयात काल सांगितलं. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना तसं कळवण्यात आलं असून त्यांचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही असं सरकारी वकिलांनी सांगितलं.

नवं धोरण १५ मे पासून अस्तित्वात आलं असून ते न स्वीकारणाऱ्या ग्राहकांची खाती अद्याप रद्द केलेली नाहीत, याबाबत प्रत्येक प्रकरणातल्या वस्तुस्थितीनुसार निर्णय घेऊ, असं व्हॉट्सअॅपच्या वकिलांनी सांगितलं. व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणामुळे खाजगीपणाच्या हक्कावर गदा येत असल्याबद्दल अनेक याचिकांची सुनावणी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी.एन पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या खंडपीठासमोर सुरु आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image