जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहात असलेले जयजीत सिंह यांची ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्याच्या गृह विभागानं काल यासंदर्भातला आदेश जारी केला. या आदेशानुसार राज्याचे विशेष अभियानाचे अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची गृह विभागाच्या विशेष प्रधान सचिवपदी, तर गृह विभागाचे विद्यमान विशेष प्रधान सचिव विनीत अग्रवाल यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली गेली आहे.