चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली.

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या महाविकास आघाडीचा सत्तेचा बोनस काळ सुरू आहे. आपण फार काळ सत्तेत राहणार नाही याची जाणीव त्यांना झाली आहे असं सांगत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली. ते आज कोल्हापूर मध्ये बातमीदारांशी  बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला येत्या ३० मे रोजी सात वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या दिवशी ‘सेवा हेच संघटन’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. देशात एक लाख, तर राज्यात वीस हजार गावात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याद्वारे, पन्नास हजार बाटल्या रक्तसंकलन करण्यात येईल. गावागावात कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येतील, अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.