तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांचा कोकण दौरा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकण दौऱ्यावर असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात विनोबा भावे यांचे स्मारक असलेल्या गागोटे बुद्रुक या गावाला भेट देत तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी केली.यावेळी त्यांनी रामा बाबू कातकरी या मयत झालेल्या इसमाच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.