पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनामुळे देशाने निसर्गऋषी गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनामुळे देशाने निसर्गऋषी गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:- पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने आज देशाने एक निसर्ग ऋषी गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून  सुंदरलाल बहुगुणा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चिपको आंदोलनातून सुंदरलाल बहुगुणा यांनी केवळ झाडे वाचवली नाहीत तर पर्यावरण रक्षणाची चळवळ घराघरात नेली.  सामान्यातील सामान्य माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला. पर्यावरण रक्षणासाठी जीवन वेचणारे बहुगुणा हे जगभरातील पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणास्थान होते. निसर्गाबद्दल नितांत आदर, जिव्हाळा असणारा निसर्गऋषी आपण गमावला आहे. पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image