समाजमाध्यमांवर नवे नियम लागू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारने नव्यानं जारी केलेल्या समाजमाध्यम विषयक नियमांचं काटेकोर पालन होत आहे ना, याचा तपशील माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यम मंचांकडे मागितला आहे. गेल्या 25 फेब्रुवारीला अधिसूचित झालेले हे नियम कालपासून लागू झाले आहेत. 50 लाखापेक्षा जास्त वापरकर्ते असलेल्या समाजमाध्यमांना हे नियम लागू आहेत.