पंतप्रधान आज ''परीक्षा पे चर्चा'' कार्यक्रमातून साधणार विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सात वाजता परीक्षा पे चर्चा या पहिल्याच भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने ते संवाद साधणार आहेत.

तणावमुक्त वातावरणात परीक्षांना कसं सामोरं जावं याबद्दल ते विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना काही सूचना आणि मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमात प्रधानमंत्री वेगवेगळ्या विषयांवर आणि विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करतील असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

यावर्षी १७ फेब्रुवारी आणि १४ मार्चला सर्जनशील लेखी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला, त्यात 81 राष्ट्रांतून विद्यार्थी सहभागी झाले होते परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देखील विद्यार्थी असाच उत्साह दाखवतील असा विश्वास त्यांनी या ट्विटर संदेशात व्यक्त केला.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image