मुंबई: भारतातील आघाडीची डिजिटल स्टॉक ब्रोकिंग कंपनी एंजल ब्रोकिंगने मार्च २०२१ मध्ये ४.१२ दशलक्ष ग्राहकांची नोंद केली. मागील वर्षी या काळातील नोंदणीपेक्षा ती १२७ टक्के जास्त आहे. एंजल ब्रोकिंगने दशकभराच्या प्रवासात आणखी एक अध्याय जोडला असून मागील दशकात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनद्वारे अनेक पारितोषिकं, प्रशंसने आणि मोठी वृद्धी मिळवल्यानंतर आता ही कंपनी फिनटेक क्षेत्रात नव्या युगातील नूतनाविष्कार करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या डिजिटल फर्स्ट धोरणाद्वारे ग्राहकांना फुल सर्व्हिस ब्रोकरेज आणि सल्लाविषयक सेवा प्रदान करत आहे. तसेच कंपनीने अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मदेखील लाँच केले आहेत. विशेष म्हणजे, या वाढीचे श्रेय नवीन पिढीतील गुंतवणूकदारांसाठी तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा एकत्रित करण्याच्या एंजल ब्रोकिंगच्या प्रयत्नांना देता येईल.
एंजलचे नवे ग्राहक टीअर २ आणि ३ शहर व गावांतील असल्याने वेगवान डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत. एंजल ब्रोकिंगच्या या वृद्धीसाठी अभिनव मोबाइल अॅप्सचे पाठबळ आहे. फिनटेक व तंत्रज्ञान उद्योजकांना प्रोत्साहन देऊन भविष्यातील संधी साधण्यावर कंपनी भर देत आहे. यामुळे एंजल ब्रोकिंगला स्मार्ट एपीआयसारखे सोल्युशन्स विकसित करण्यास मदत झाली. परिणामी डिसेंबर २०२० पर्यंत १०,००० पेक्षा जास्त ग्राहक नोंदणी झाली. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म तयार करण्यात या प्रोग्रामची मोठी भमिका होती. एंजल ब्रोकिंगने आता एक पाऊल पुढे टाकत, फिनटेक इकोसिस्टिम तयार करण्यासाठी मदत सुरु केली आहे. पुढील पिढीतील प्रतिभा आणि नूतनाविष्कारास प्रोत्साहन देणे व त्याची जोपासना करण्याकरिता कंपनी आता इन्क्युबेशन प्रोग्राम तयार करत आहे.
एंजल ब्रोकिंगचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी म्हणाले, “एंजल ब्रोकिंगने आतापर्यंत भारतीयांसाठी शेअर बाजारात डिजिटायझेशन आणि लोकशाहीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. आपची पुढील पायरी, सामूहिक नूतनाविष्कार दुपटीने वाढवणे, ही असून, याद्वारे आम्ही नव्या काळातील फिनटेकची जोपासना व विकास करू शकू. याद्वारे सध्याची परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल. याद्वारे भविष्यातील फिनटेक उद्योजक तयार होतील, भारतातील वित्तीय क्षेत्राचे अधिक चांगल्या प्रकारे बदलेल, असे आम्हाला वाटते.”
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.