देशात ८९ हजार १२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी १५ लाख ६९ हजार २४१ रुग्ण, कोरोनामुक्त झाले असून, सध्या देशभरात सहा लाख ५८ हजार ९०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात काल नव्या ८९ हजार १२९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर ७१४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या १ कोटी २३ लाख ९२ हजार २६० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत १ लाख ६४ हजार ११० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ४४ हजार २०२ रुग्ण बरे झाले.