लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार ५० टक्के लस विनामूल्य देणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार आपल्या कोट्यातील ५० टक्के कोविड प्रतिबंधात्मक लस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य देणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

प्रत्येक पात्र व्यक्तीचं लसीकरण करण्यासाठी खासगी क्षेत्रासाठीदेखील हा कोटा खुला करण्यात आला आहे. राज्यांनी, त्यांच्या प्राधान्याने आणि वचनबद्धतेनुसार केंद्र सरकारमार्फत मोफत किंवा खाजगी रुग्णालयात लस दिली गेली नाही फक्त अशा लोकांना लस द्यावी असे सांगत केंद्र सरकार लस मोफत देत असले तरी राज्यांनी इतर माध्यमातूनही लस खरेदी करावी असंही हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.