पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम कामगारांसाठी कामगार नाक्यावर अटल आहार योजना पूर्ववत सुरू करा ; आमदार लक्ष्मण जगताप यांची कामगार मंत्र्यांकडे मागणी

 

पिंपरी : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणारी अटल आहार योजना पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणच्या कामगार नाक्यांवर पूर्ववत तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार व पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊन लागून दोन आठवडे झाले आहेत. या कालावधीत कामगार घरातच राहिले आहेत. हाताला काम नसल्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अटल आहार योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी किंवा कामगार नाक्यावर मोफत जेवण पुरवण्यात येते. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा ही योजना राबवण्यात आली. त्यामुळे शेकडो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आपले पोट भरण्यासाठी ही योजना लाभदायी ठरली. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अटर आहार योजना बंद करण्यात आली. तसेच बांधकामाच्या ठिकाणीच या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यात आला.

मात्र सध्या लॉकडाऊनमुळे कामच बंद असल्याने कामगार बांधकामाच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. कामगार नाक्यावर ही योजना सुरू केल्यास उपासमारीची वेळ आलेल्या शेकडो बांधकाम कामगारांना मदत होईल. हातावर पोट असलेल्या या गोरगरीब कामगारांचा विचार करून महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणारी अटल आहार योजना कामगार नाक्यावर पुर्ववत तातडीने सुरु करण्याचे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”


Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image