क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मुंबईतील रुग्णालयात दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना आज मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सचिन यांनी ट्विटरवर आज ही माहिती दिली. सचिन तेंडुलकर यांना कोरोनाची लागण झाल्यानं ते गेले काही दिवस गृह विलगीकरणात होते. मात्र अधिक खबरदारी म्हणून आपण रुग्णालयात दाखल होत असल्याचं त्यांनी सांगितले.