२०२०-२१ या आर्थिक वर्षात प्रतिदिन ३७ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्याचा विक्रम

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत देशातल्या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कामात चांगली प्रगती करून दाखविली आहे. मंत्रालयाने २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्रतिदिन ३७ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्याचा विक्रमी टप्पा गाठण्यात अभूतपूर्व यश मिळविले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संध्याकाळी झालेल्या समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि त्यांना कृतज्ञता पत्रे प्रदान केली.