भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य श्री. भिमराव धोंडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव श्री.राजेंद्र भागवत, उप सचिव, श्री.विलास आठवले, श्री. राजेश तारवी, सभापतींचे सचिव श्री. महेंद्र काज, अवर सचिव श्री. रविंद्र जगदाळे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी श्री.निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.