कोविशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवावी- अदर पुनावला यांची विनंती
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशिल्ड या लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवावी, अशी विनंती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन यांना पत्र पाठवून केली आहे.
सध्या देशात कोविशिल्ड या लशीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसंच लस मैत्री, या अभियानांतर्गत कोविशिल्ड या लशींची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जात आहे. सिरम इन्स्टिट्युटनं कोविशिल्डच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा मालासाठी सेपी या कच्चा मालाचे निर्मिती करणाऱ्या कंपनी बरोबरच ७५ कोटींचा करार केला आहे. सध्या या कच्च्या मालाच्या निर्मितीवर अमेरिकेनं बंदी घातल्यामुळे कोविशिल्डच्या निर्मितीवर परिणाम झाला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.