मुंबईत लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे, मात्र मुंबईत लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबईतल्या २६ लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण होणार नाही. मुंबईत १२० लसीकरण केंद्र असून, ४९ सरकारी, तर ७१ खाजगी लसीकरण केंद्र आहेत. अनेक केंद्रांवर उद्यापर्यंत लसीकरण होऊ शकेल, इतकाच साठा शिल्लक आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दररोज ४० ते ५० हजार लाभार्थ्यांना या केंद्रांवर लसीच्या मात्रा दिल्या जातात. मुंबईला परवा पर्यंत १७ लाख ९ हजार ५५० लसीच्या मात्रा उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी १५ लाख ६१ हजार २२० लसींच्या मात्रा वापरण्यात आल्या आहेत. कालपर्यंत केवळ १ लाख ४८ हजार १३० लसींचा साठा शिल्लक होता. दुसऱ्या डोस साठी केवळ ४४ हजार ८१० मात्रा शिल्लक आहेत, असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.