१६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राज्यांमधली वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकारनं १६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या कामावर २०१ कोटी रुपये खर्च होणार असून त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीक्षमतेत १५४ टनांची भर पडेल. यापैकी ३३ प्रकल्पांची संयंत्र कार्यान्वित झाली असून त्यातलं एक महाराष्ट्रात आहे.

आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, हरयाणा, दिल्ली,केरळ, पुद्दुचेरी, पंजाब, आणि उत्तर प्रदेशमध्येही प्रत्येकी एक प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. मध्य प्रदेशात ५, हिमाचल प्रदेशात ४,तर चंडीगढ, गुजरात आणि उत्तराखंड मधे प्रत्येकी ३ प्रकल्प कार्यान्वित आहे. बिहार, कर्नाटक आणि तेलंगणमधे प्रत्येकी २ प्रकल्प सुरु झाले आहेत.

या महिनाअखेरपर्यंत देशभरात आणखी ५९ तर पुढच्या महिनाअखेरपर्यंत आणखी ८० प्रकल्प उभे राहतील.

राज्यांनी या उपाययोजनेचं स्वागत केलं असून आणखी १०० संयंत्र सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यालाही मंजुरी देणार असल्याचं केंद्रीय आरोग्य खात्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image