अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यासंदर्भातला आदेश रद्द

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्प बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्यासंदर्भातला आदेश सरकारनं रद्द केला आहे. अल्प बचत योजनांवरचा व्याजदर मार्च २०२१ च्या स्तरावर कायम राहील असं अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. २०२०- २०२१ च्या शेवटच्या तिमाहीतले व्याजदर तसेच राहतील असं ट्विट त्यांनी केलं.