निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राज्यात प्रचारासाठी येणार आहेत. ते सिलीगुडी आणि नाडीया जिल्ह्यांमध्ये दोन सभा घेणार आहेत. गेल्या 10 दिवसात ते चौथ्यांदा राज्यात येत आहेत. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या दक्षिण 24 परगणा जिल्हयात तीन सभा घेणार आहेत. 17 एप्रिलला कर्नाटकमधल्या बेळगावी आणि आंध्र प्रदेशातल्या तिरुपती इथं लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान होत आहे.