महाराष्ट्रातील मनसुख हिरेन हत्याप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या.

या गाडीचे मालक यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी ठाण्याजवळ सापडला होता. याप्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे अर्थात एनआयएकडे सोपवला आहे.

सध्या महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयए त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास हाती घेईल.