रामदास आठवले यांनी केली रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडीची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडीची घोषणा पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल नवी दिल्ली इथे केली.

आरपीआय क्रीडा आघाडी खेळाडूंना प्रोत्साहन, मार्गदर्शन, आणि मदत देईल. खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी ही क्रीडा आघाडी देशभर कार्यरत राहील, असे ते म्हणाले. क्रीडापटूंच्या आणि एकूणच क्रीडा क्षेत्रातल्या समस्या दूर करण्यासाठी लवकरच आपण केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षाच्या क्रीडा आघाडीच्या राष्ट्रीय प्रमुख संघटकपदी दिनेश कांडा यांची नियुक्ती केल्याची अधिकृत घोषणा आठवले यांनी केली.