परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ईमेलची सत्यता तपासण्याचे काम सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपासंबंधीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या ईमेलची सत्यता तपासण्याचं काम सुरु असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं एका निवेदनाद्वारे कळवलं आहे.

मुख्यमंत्र्यांना इमेलद्वारे आलेल्या या पत्रावर स्वाक्षरी नव्हती तसंच, हा ईमेल परमबीर सिंह यांनी राज्य सरकारनं आपीएस अधिकारी म्हणून, वैयक्तिक वापरासाठी दिलेल्या parimbirs@hotmail.com या ईमेलवरुन आलेला नाही, तर paramirs३@gmail.com या ईमेल आयडीवरून आलेला आहे असंही मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे ज्या ईमेलआयडीचा वापर करून हे पत्र पाठवलं गेलं त्याचा तपास सुरु असल्याचं, तसंच परमबीर सिंह यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं कळवलं आहे.