जळगाव महानगर पालिकेत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची महापौरपदी निवड

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव महानगरपालिकेत आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन  महापौरपदी निवडून आल्या. त्यांनी भाजपाच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव केला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेनचे कुलभूषण पाटील विजयी ठरले. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला. या निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान घेण्याला भाजपने विरोध केला होता.