आय सी सी मानांकनात विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम, तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, अर्थात आयसीसीनं, एक दिवसीय आणि २० षटकांच्या सामन्यासाठीची आपली मानांकनं जाहीर केली आहेत. एक दिवसीय सामन्यांमध्ये, रोहित शर्मा पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर गेला आहे तर भारतीय कप्तान विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे. आयसीसीनं ही मानांकनं ,भारत इंग्लंड दरम्यान झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यानंतर, जाहीर केली आहेत.

गोलंदाजीमध्ये भारताचा भुवनेश्वर कुमार पहिल्या २० जणांच्या यादीत आहे. २० षटकांच्या सामन्यांमध्येही विराट कोहली पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे तर रोहित शर्मा १७ व्या स्थानावरून १४ व्या स्थानावर पोहोचला आहे.