स्वदेशी बनावटीची आय एन एस करंज या पाणबुडीचं आज मुबंईत जलावतरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय एन एस करंज ही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची पाणबुडी आज औपचारिकपणे भारतीय नौदलात रूजू झाली.

मुंबईतल्या नौदल डॉकिर्याडमधे झालेल्या शानदार समारंभात सेवानिवृत्त अॅडमिरल व्ही एस शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीत या पाणबुडीचं जलावतरण झालं.

आय एन एस कलवरी आणि आय एन एस खांदेरी यांच्या सारख्या स्कॉर्पियन श्रेणीतली ही पाणबुडी माजगाव गोदीमध्ये प्रकल्प ७५ अंतर्गत बांधण्यात आली आहे.

हे देशाच्या आत्मनिर्भरतेचं सुयोग्य प्रतीक असल्याचं प्रमुख पाहुण्यांनी सांगितलं.

या पाणबुडीवर बसवलेली अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि इतर उपकरणांमुळे ती सागरी शत्रूवर वेगानं हल्ला करू शकता.