प्रधानमंत्री येत्या रविवारी आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ७५ वा भाग आहे.

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून, तसेच www.newsonair.com हे संकेतस्थळ आणि newsonair या मोबाईल अॅपवरून या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.आकाशवाणी, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम थेट ऐकता येईल.

या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुनःप्रसारण केलं जाईल.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image