प्रभादेवीतील गॅमन हाऊसला आग

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत प्रभादेवी इथल्या वीर सावरकर मार्गालगत असलेल्या गॅमन हाऊस या पाच मजली इमारतीत आज सकाळी आग लागली, या आगीत इमारतीचं नुकसान झालं असून, जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलान दिली.

दहा अग्निशमन बंबाच्या मदतीनं आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रभादेवी इथल्या आगीची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही.