एसटी महामंडळाच्या "स्मार्ट कार्ड" योजनेला मुदतवाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या "स्मार्ट कार्ड " योजनेला आणखी ३० सष्टेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३१ मार्च पर्यंत ही मुदतवाढ होती मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला मुदतवाढ दिल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी  दिली आहे. 

राज्य  सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्क्या पासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या " स्मार्ट कार्ड " काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे.

कोरोना संकटामुळे सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणं शक्य नसल्यानं तसंच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्यानं या योजनेला मुदतवाढ देण्यात आले आहे त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळानं  दिली आहे.

Popular posts
स्टडी ग्रूपची टीसाइड युनिव्हर्सिटीशी हातमिळवणी
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image