सौदीच्या नेतृत्वाखालील युद्धाला अमेरिका पाठिंबा देणार नाही - जो बायडेन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : येमेनमध्ये सुरू असलेल्या सौदीच्या नेतृत्वाखालील युद्धाला आता अमेरिका पाठिंबा देणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे.

सौदी अरेबियाचे स्वातंत्र्य आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरीकेचा पाठिंबा आहे, मात्र युद्धासाठी नाही. हे युद्ध संपले पाहिजे, असे बायडेन यांनी काल आपल्या पहिल्या परराष्ट्र धोरण विषयक भाषणात सांगितलं. दरम्यान, जर्मनीतील अमेरिकन सैन्य काढून घेण्यास सध्या स्थगिती देण्याची शक्यता असून, एलजीबीटी क्यू चळवळीला त्यांचा पाठींबा असेल, असेही त्यांनी सांगितलं.