आत्मनिर्भर भारत अभियानाचा उपयोग केवळ भारतालाच नाही; तर संपूर्ण जगाला होईल - पंतप्रधान
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत अभियान हे नवीन भारत उभारणीचा असा मार्ग आहे ज्यामुळे केवळ भारताच्या गरजा भागणार नाहीत तर त्याचा संपूर्ण जगालाही उपयोग होईल असं प्रतिपादन , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं.
नीती आयोगाच्या प्रशासनिक परिषदेची 6 वी बैठक पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली आज दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झाली त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान पुढ म्हणाले की विकास हा आपला मुख्य मुद्दा असून, वेगाने विकासाच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी भारतीयांनी आता आपल मन तयार केलं आहे आणि ते वेळ वाया जाऊ द्यायला तयार नाहीत.
या नव भारताच्या निर्मित्तीत देशातील तरुण महत्वाची भूमिका बजावत आहेत. या आत्मनिर्भर अभियानात देशातील खाजगी क्षेत्र ही नवीन उर्जे सह पुढे आलं असून, यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेल्या भरघोस आर्थिक तरतुदीच सर्वत्र स्वागत होत आहे असं ही मोदी म्हणाले.
देशातल्या ग्रामीण आणि शहरी भागात 2014 पासून, 2 कोटी 40 लाख घरं बांधण्यात आली असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, सध्या देशातल्या 6 राज्यात घरं उभारण्याच काम सुरू आहे, तसच जल जीवन अभियाना अंतर्गत गेल्या 18 महिन्यात देशातल्या ग्रामीण भागातील साडेतीन कोटी घरांपर्यंत बंद नळाद्वारे पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.