कार्यालयांमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवी प्रमाणित कार्यपद्धती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यालयांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. यानुसार, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये औषधाची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंदच राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कार्यालयांमध्ये सार्वजनिक आरोग्य सुरक्षेच्या सर्वसाधारण नियमांचे पालन केले जावे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

सर्व कर्मचारी आणि कार्यालयांना भेट देणाऱ्या नागरिकांनी या नियमांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  या नियमांमध्ये, व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर राखणे, मास्कचा वापर आणि सातत्याने हात धुणे यांचा समावेश आहे. 

कार्यालयांच्या प्रवेश द्वारावरच येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करून केवळ लक्षणे नसणाऱ्यांनाच प्रवेश दिला जावा, प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली जावी, बैठकांसाठी  शक्यतो दूर दृश्य प्रणालीचा वापर करावा, अशा सूचनाही आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत.

कार्यालयांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास त्या रुग्णावर डॉक्टरांमार्फत उपचार सुरू करतानाच त्याने कार्यालयात ज्या ठिकाणांना भेट दिली आहे, त्या भागांचे तातडीने निर्जंतुकीकरण करावे, असे सांगण्यात आले आहे.

Popular posts
स्टडी ग्रूपची टीसाइड युनिव्हर्सिटीशी हातमिळवणी
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image