जळगाव जिल्ह्यातले शहीद जवान सागर धनगर यांच्या पार्थिवावर तांबोळे या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातले शहीद जवान सागर धनगर यांच्या पार्थिवावर, आज चाळीसगाव तालुक्यात तांबोळे या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. सागर धनगर हे २०१७ ला भारतीय लष्करात भरती झाले होते.

मणिपूर इथं कर्तव्यावर असताना, गोळी लागल्यानं त्यांना वीरमरण आलं. सागर धनगर यांच्या अंत्यसंस्काराला ग्रामस्थांसह, खासदार उन्मेश पाटील, स्थानिक आमदार मंगेश चव्हाण आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.