वर्ध्याजवळ भूगाव इथल्या एका कंपनीत झालेल्या स्फोटात ३५ कामगार जखमी  

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वर्धा शहराजवळ भूगाव इथल्या उत्तम गलवा कंपनीत आज सकाळी अचानक स्फोट झाला. त्यात ३५ कामगार जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून सावंगी ठाणेदार रेवचंद शिंगांनजुडे आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ब्लास्ट फर्निशचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

२८ जखमींना सावंगी मेघे इथं आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय दाखल केलं आहे. तीन जखमींना तातडीनं नागपूरला हलवलं आहे. या स्फोटाची चौकशी कामगार अधिकाऱ्यामार्फत करण्याचे आदेश दिले आहेत, चौकशीअंती दोषींवर कारवाई होईल, असं घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बातमीदारांशी बोलतांना सांगितलं.