ओरिफ्लेमने बेबी केअर उत्पादनांची श्रेणी लॉन्च केली
• महेश आनंदा लोंढे
मुंबई: ओरिफ्लेम या अग्रेसर सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रँडने नैसर्गिक बेबी केअर उत्पादनांची श्रेणी 'बेबी O’ लॉन्च केली आहे. बाळाच्या त्वचेच्या देखभालीकरिता सादर करण्यात आलेल्या या श्रेणीत हेअर व बॉडी वॉश, बेबी ऑइल, बमबम क्लीन्झिंग मिल्क, मल्टी परपज बाम यांचा समावेश आहे. स्किनकेअरमध्ये ब्रँडच्या सखोल ज्ञानावर आधारदित, ओरिफ्लेमे प्रत्येक बेबी O’ उत्पादनाला सुंदर, गोल्डन स्वीडिश ओट ऑइलसह समृद्ध केले आहे. जे केवळ बाळाच्या त्वचेला हायड्रेट करत नाही तर आपल्या बाळाच्या त्वचेला बाह्य संसर्गापासून वाचवण्यासाठी मजबूत भिंतही तयार करते. जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त स्किन हेल्थ अलायन्सच्या नामांकित बालरोगतज्ञांनी प्रत्येक उत्पादनाच्या फॉर्मुलेशनला समर्थन दिले आहे.
आनंददायी अंघोळीसाठी बेबी O’ ने टीअर फ्री, सौम्य क्लिन्झिंग व कंडिशनिंग जेल आणले असून ते संपूर्ण शरीरासाठी वापरता येते. हा सौम्य, फेस होणारा फॉर्म्युला तुमच्या बाळाचे नाजूक केस व त्वचा मऊ, आरामदायी आणि सुरक्षित ठेवते. सुखदायक बेबी O’ ऑइल हे बाळाची मौल्यवान त्वचेचे पोषण व संरक्षण करण्यासाठी तयार केलेले एक केअरिंग तेल आहे. गोल्डन स्वीडिश ओट ऑइल व सीड ऑइल कॉम्प्लेक्स वापरून तयार केलेले हे सर्वत वेगळे तेल त्वचेतील अडथळे दूर करून त्वचा भरून काढते व ती मजबूत करते. बेबी O’ मल्टीपर्पज बाम हा बाळाच्या संवेदनशील त्वचेला शांत व आतपर्यंत पोषक ठरतो. स्वीडिश ओट तेलामुळे, बाम आर्द्रता टिकवून ठेवण्यास त्वचेला मजबूत बनवते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.