एंजल ब्रोकिंग लिमिटेडद्वारे ‘अंकित रस्तोगी’ यांची नियुक्ती

 https://ekachdhyeya.com/wp-content/uploads/2021/01/Angel-Broking-Logo-1.png

मुंबई: एंजल ब्रोकिंग लिमिटेडने अंकित रस्तोगी यांची मुख्य उत्पादन अधिकारी (सीपीओ) पदावर नियुक्ती केली आहे. अंकित यांच्यावर उत्पादन विकास, मूलभूत संशोधन आणि एआरक्यू प्राइमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या तंत्रज्ञानातील अनुभवाचा लाभ घेत या क्षेत्रात नवे बेंचमार्क प्रस्थापित करण्याची आशा कंपनीला आहे.

एनआयटी सुरत येथे कंप्यूटर इंजिनिअरिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या अंकित यांना डिजिटल सर्व्हिस श्रेणीत विस्तृत अनुभव आहे. गोईबिबोच्या ऑनलाइन हॉटेल व्हर्टिकलला वेग देण्यापासून ते स्टॅझिलामध्ये मार्केटप्लेस पुरवण्यापर्यंत, तसेच क्लिअरट्रीप कंपनीत भारत व मध्यपूर्वेत सोयीसुविधा उभ्या करण्याचाही अनुभव त्यांना आहे. मागील काही काळापासून ते मेकमायट्रिप येथे ट्रॅव्हलटेक कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदावर होते. प्रॉडक्ट इंजिनिअरिंगमधील १७ वर्षांच्या अनुभवाद्वारे, अंकित यांनी बी२बी आणि बी२सी दोन्ही श्रेणींचा अनुभव घेतला तसेच भारतीय आणि विदेशी बाजारांच्या नावीन्यपूर्ण उत्पादने तयार केली.

श्री अंकित रस्तोगी म्हणाले, “भारतातील वित्तीय सेवा क्षेत्र हे अत्यंत दुर्लक्षित आहे, असे मला वाटते. मात्र या क्षेत्रात योग्य दृष्टीकोन ठेवल्यास मोठ्या प्रमाणात प्रगती होऊ शकते. एंजेल ब्रोकिंग हा डिजिटल ब्रोकिंग क्षेत्रातील लीडर आहे, हे स्पष्टच आहे. त्यामुळे या संधीचा मला फायदाच होईल. टेक-प्रॉ़डक्ट पॉवरहाऊस असलेल्या एंजेल ब्रोकिंगच्या सर्व क्षमतांचा वापर करत प्रगतीच्या मार्गाला वेग देण्यावर माझा भर असेल. जेणेकरून सर्वोच्च वृद्धीच्या या सेगमेंटमध्ये जास्त वेगाने अपेक्षित स्थान गाठले जाईल.”

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सीईओ श्री विनय अग्रवाल म्हणाले, “एंजेल ब्रोकिंगच्या कुटुंबात अंकित यांची नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांचे नेतृत्व आणि तंत्रज्ञानआधारीत उत्पादने व सेवांमधील सखोल ज्ञान यामुळे अग्रेसर कंपनी बनण्याच्या आमच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल.”

एंजल ब्रोकिंग लिमिटेड कंपनीत नुकतेच आम्ही अनेक ग्राहक केंद्रित उत्पादनांचे आविष्कार सादर केले. यात गुंतवणुकदारांच्या शिक्षणासाठीचे स्मार्ट मनी प्लॅटफॉर्म आणि एआय-आधारीत शिफारस इंजिन एआरक्यू प्राइम यांचा समावेश आहे. आमच्या तंत्रज्ञान आधारीत नूतनाविष्कारांमुळे गुंतवणुकदारांना केवळ एका बटनाच्या स्पर्शाद्वारे ५ मिनिटाच्या आत गुंतवणूक सुरू करता येते.