देशात गेल्या २२ महिन्यांत रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू नाही - पीयूष गोयल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २२ महिन्यांत देशात रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत आज एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेगाड्यांमध्ये अद्ययावत सुरक्षा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशातील जनतेच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधा विकासावर भर देण्यात येत आहे, असेही गोयल यांनी नमूद केले.