तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबादमधे नरेंद्र मोदी स्टेडिअममधे झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्याच दिवशी भारतानं इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
याबरोबरच ४ सामन्यांच्या या मालिकेत भारतानं २-१ अशी आघाडी घेतली आहे. 

काल इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गील मैदानात उतरले. पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळवलेली असल्यानं भारताला विजयासाठी फक्त ४९ धावांची गरज होती. ती या दोघांनी पूर्ण केली.इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ४ बळी मिळवणारा आर आश्विन सर्वात जलद ४०० बळी मिळवणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.