एमेझ़ॉन इंडिया आता भारतात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनास सुरवात करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमेझ़ॉन इंडिया आता भारतात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनास सुरवात करणार आहे. एमेझ़ॉन फायर टीव्ही स्टिकच्या उत्पादनाने त्याची सुरुवात होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांची आज एमेझ़ॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारतातले प्रमुख अमित अगरवाल यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली . त्यानंतर ही घोषणा करण्यात आली.