अवकाळी पावसाची विदर्भाच्या काही भागात हजेरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली .वाशीम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील काही गावात पाऊस झाल्यानं शेतकरी धास्तावला आहे. सध्या  जिल्ह्यात हरभऱ्याचं पिक काढणीला आलं  असून शेतात गहू उभा असल्यानं पावसामुळेया पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

अकोला जिल्ह्यातल्या वाडेगाव, देगाव, रिधोरा, तेल्हारा, वरूड बुजरुक, अकोट सह अकोला शहरातही पावसानं हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यात काल रात्री वरुड,अचलपूर, चांदूर बाजार,चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गोंदियात पडलेल्या पावसाचा फटका   कडधान्य  आणि गहू पिकाला बसण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.