नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त “पराक्रम दिवस” कार्यक्रमाचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालच्या दौर्यारवर जाणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोलकाता इथं "पराक्रम दिवस"  कार्यक्रमाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

नेताजींचा २३ जानेवारी हा जन्मदिवस "पराक्रम दिवस" म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी आणि व्हिक्टोरिया येथील कार्यक्रम होणार आहेत.

यावेळी १९२६ ते १९३६ दरम्यान सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेल्या पत्रांचे संकलन प्रसिद्ध केले जाणार असून प्रोजेक्ट मपिंगच सादरीकरण केलं जाणार आहे. तत्पूर्वी मोदी आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये नेताजींच्या जीवन कार्यावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.

या वेबीनारमध्ये अमेरिका, जर्मनी, म्यानमा, थायलंड आणि बांग्लादेशमधून  नेताजींवर संशोधन केलेले तज्ञ दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आझाद हिंद फौजेशी संबंधित व्यक्तींचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त
Image
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image