राज्यात पहिल्या टप्प्यात कोविड लसीकरणासाठी १६ लाख डोस लागणार असल्याची, आरोग्यमंत्री यांची माहिती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात पहिल्या टप्प्यात कोविड लसीकरणासाठी १६ लाख डोस लागणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. पहिल्या टप्प्यात ८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची कोविन ॲपवर लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे, या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन डोस प्रमाणे लसीचे एकूण १६ लाख डोस लागणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.