जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

 

पुणे : जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना आज जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपजिल्हाधिकारी अनुक्रमे संजय तेली, प्रवीण साळुंके, सुरेखा माने, राणी ताटे, स्नेहल भोसले, खनि कर्म अधिकारी संजय बामणे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उत्तम पाटील, तहसिलदार शुभांगी फुले यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image