पर्यावरणातले बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नागरिकांना आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रत्येकानं पर्यावरणातले बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक करायला हवी असं आवाहन मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी केलं आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीनं  ‘माझी वसुंधरा’या अभियानांतर्गत आज ऑनलाईन पद्धतीनं ई - शपथ दिली गेली. या कार्यक्रमात ते बोलत होते.

उमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातले अनेक जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनीही यावेळी विभागाच्या पोर्टलवर ऑनलाईन शपथ घेतली.

यानिमीत्तानं बुलडाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑनलाईनपद्धतीनं शपथ दिली. ‘माझी वसुंधरा’ या अभियानामुळे वातावरणातल्या बदलांमूळे झालेलं नुकसान भरुन काढायला मदत होईल असं ते म्हणाले.