ओरिफ्लेमचे मुंबईत नवीन सेवा केंद्र सुरु

 


मुंबई: ओरिफ्लेम या अग्रगण्य सोशल सेलिंग स्विडिश ब्युटी ब्रँडने मुंबईत विलेपार्ले, पूर्व येथे नवीन सेवा केंद्र सुरु केले आहे. ओरिफ्लेमचे हे नवे केंद्र २,७०० चौरस फूट परिसरात विस्तारले असून त्यात स्वतंत्र ट्रेनिंग व मीटिंग रुम्स आहेत. जेणेकरून ब्रँड पार्टनर्सना आणखी ट्रेनिंग आणि मीटिंग्स घेता येतील. भारतात २५ वर्षे पूर्ण केल्यानंतर या सर्व्हिस सेंटरच्या लाँचिंगद्वारे ब्रँडने लीडरशिप डेव्हलपमेंट व ब्रँड पार्टनर्सना सतत सक्षम करण्याची वचन पाळले आहे. देशात उत्कृष्ट ग्राहक अनुभवाद्वारे ग्राहक व भागीदारांचे स्वप्न पूर्ण करण्याचे वचन ओरिफ्लेमने दिले असून याच दिशेने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.

ओरिफ्लेम इंडिया एमडी व साऊथ एशियाचे उपाध्यक्ष व प्रमुख, श्री फ्रेडरीक विडेल म्हणाले, “ब्रँडचे नवे सेवा केंद्र मुंबईत सुरु करण्याची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ओरिफ्लेमकडून मिळणारा अनुभव वृद्धिगंत करणे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच मिळवून नेटवर्क वाढवण्याच्या आमच्या योजनेचाच हा एक भाग आहे. लोकांनी त्यांच्या क्षमता वाढवाव्यात व त्यांचे स्वप्न पूर्ण करावेत यासाठी ओरिफ्लेमचे हे प्रयत्न असून स्वप्नांचे शहर असलेल्या मुंबईपेक्षा यासाठी दुसरी कोणती चांगली जागा नाही.”