आजच्या स्टार्ट अप कंपन्या या भविष्यातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या होतील - पंतप्रधान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजच्या स्टार्ट अप कंपन्या या भविष्यातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ओडिशामधल्या संबळपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था - आयआयएमच्या कायमस्वरुपी कॅम्पसची पायाभरणी पंतप्रधानांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. शेती क्षेत्रापासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंत स्टार्ट अप्सची व्याप्ती वाढत असून, देशातल्या बहुतांशी शहरामंध्ये आता स्टार्टअप्स येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

२०१४ पर्यंत देशात १४ व्यवस्थापन संस्था होत्या, त्यांची संख्या आता २० झाली असल्याचं ते म्हणाले. या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आलेले विद्यार्थी आत्मनिर्भर भारताच्या अभियानाला बळकटी देतील, असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. 


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image