मुंबई शेअर बाजारात नववर्षाच्या पहिल्या सत्रात तेजी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज नववर्षाच्या पहिल्या सत्रात तेजी राहिली आणि निर्देशांक ११८ अंकांनी वधारून आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर ४७ हजार ८६९ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ३७ अंकांनी वधारला आणि त्यानं  १४ हजार १९ अंकांचा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला.