मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून १८ कोटी ८७ लाखाचा दंड वसूल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी  मास्क वापरणं अनिवार्य असलं तरी मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे.

कोरोनाच्या काळात आतापर्यंत ९ लाख २५ हजार बेशिस्त मुंबईकर विनामास्क फिरताना आढळून आले असून, महानगरपालिकेच्या क्लीन अप मार्शल नं त्यांच्याकडून अंदाजे १८ कोटी ८७ लाखाचा दंड वसूल केला आहे.