स्पेनमध्ये नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचे ४ रुग्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपमध्ये अनेक ठिकाणी कोरोना विषाणूच्या नवा प्रकाराचा प्रसार झाल्याचं आढळून आलं आहे. युनायटेड किंगडममध्ये प्रथम सापडलेल्या ह्या प्रकाराचे ४ रुग्ण स्पेनमध्ये आढळले आहेत. हे सर्वजण नुकतेच युनायटेड किंगडममध्ये प्रवास करून आले आहेत.

फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलियानं या विषाणूचे रुग्ण सापडल्याची पुष्टी दिली असून जपान मध्येही रुग्ण सापडले आहेत.