प्रधानमंत्री उद्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वित्तीय लाभाचा पुढचा हप्ता करणार जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या २५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता दूर दृष्य प्रणाली द्वारे, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वित्तीय लाभाचा पुढचा हप्ता जारी करणार आहेत.

प्रधानमंत्र्यांनी बटन दाबल्यानंतर ९ कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना १८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी हस्तांतरित होईल. या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान सहा राज्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.